CM Eknath Shinde आज ज्योतिर्लिंग भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 10:17 AM

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्योतिर्लिंग भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार आहेत. श्रावण महिन्यातील चौथ्या शनिवारी मुख्यमंत्री हे भीमाशंकरचे दर्शन घेतील.

राज्यातील सत्ता आपल्याकडे खेचण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे केले आहेत. तर अनेक निर्णयही घेतले आहेत. काल दहीहंडी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी राजकीय टोलेबाजी देखील केली. तसेच आम्ही विकासाची दहीहंडी फोडू मात्र मलई जनता खाणार असल्याचा टोला ही त्यांनी शिवसेनेसह मागील सरकारला लगावला. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्योतिर्लिंग भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार आहेत. श्रावण महिन्यातील चौथ्या शनिवारी मुख्यमंत्री हे भीमाशंकरचे दर्शन घेतील.

Published on: Aug 20, 2022 10:17 AM
Aurangabad | औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात-tv9
Mumbai Municipal Corporation Election : उपमुख्यमंत्री मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं नारळ फोडणार, षण्मुखानंद सभागृहात आज भाजपचा मेळावा