याच्याआधीचा अयोध्या दौरा हा केवळ लोकांच्या डोळ्यात धुळपेत करणारा; शिवसेना नेत्याची ठाकरेंवर जळजळीत टीका

| Updated on: Apr 09, 2023 | 8:31 AM

याच्याआधी ही आपण शिवसेनेच्या अशा अयोध्या दौऱ्यात असायचो. त्यावेळी ही नियोजन करत होतो. पण आता समाधान मिळत आहे. याच्याआधी झालेला उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा होता

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याची जय्यत तयारी अयोध्येत करण्यात येत आहे. ठिक ठिकाणी स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे जागोजागी शिवसेनेचे झेंडे लावण्यात आल्याने वातावरण शिवसेनामय झाले आहे. यावेळी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

याच्याआधी ही आपण शिवसेनेच्या अशा अयोध्या दौऱ्यात असायचो. त्यावेळी ही नियोजन करत होतो. पण आता समाधान मिळत आहे. याच्याआधी झालेला उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा होता. पण हा दौरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्ववादाचा विचार नेणाऱ्या शिंदेंचा आहे. ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी डोळ्यात पाणी आणि मनात खंत होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा शिवसेना पक्ष असतानाही तसं आम्ही वागत नव्हतो. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला सत्तेसाठी त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागलं. पण आता शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उठाव केला, पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांशी जोड गेला आहे.

Published on: Apr 09, 2023 08:31 AM
साई भक्तांना आणखी एक मोठं गिफ्ट! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….
‘या’ कारणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा; सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य