… आता डॉक्टर, पण याच्याआधीही छोटे – मोठे ऑपरेशन; CM शिंदे मिश्किल वक्तव्य

| Updated on: Mar 29, 2023 | 10:09 AM

शिंदे यांनी, कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही एक खंत ही मनात होती. परंतु एक जिद्द होती मनामध्ये त्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी बीए डिग्री घेतली

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, डी वाय पाटील विद्यापीठाकडून डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली.

शिंदे यांनी, कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही एक खंत ही मनात होती. परंतु एक जिद्द होती मनामध्ये त्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी बीए डिग्री घेतली. चांगले गुण मिळवून उत्तीर्णही झालो. आणखी पुढे आणखी काय काय करायचं. मात्र आता डॉक्टर एकनाथ शिंदे झालो. पण मी याच्याआधीच डॉक्टर झालो. मी छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो असे ते म्हणाले.

 

Published on: Mar 29, 2023 10:08 AM
अपशब्द वापरला हे सिद्ध करा, राजीनामा देईन; शिरसाट यांचे अंधारेंना आवाहन
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून महिनाभर पाणीकपात लागू