Eknath Shinde : खातं कोणतं त्यापेक्षा त्या खात्याला न्याय देणं महत्वाचे, खातेवाटपावरून स्पष्टीकरण

| Updated on: Aug 15, 2022 | 6:53 PM

खातेवाटपावरुन कोणी नाराज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई : खातेवाटपावरुन पुन्हा मंत्र्यामध्ये नाराजी अशी कुजबूज सुरु झाली आहे. शिवाय याबाबत दादा भुसे यांनी बोलूनही दाखवले आहे. मात्र, खाते कोणतेही असो त्याला खऱ्या अर्थाने न्याय देणे महत्वाचे असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीची आठवणच मंत्र्यांना करुन दिली आहे. आगोदर मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही म्हणून नाराजी त्यानंतर चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराजी हे योग्य नाही. पण खातेवाटपावरुन कोणी नाराज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 15, 2022 06:53 PM
Pankaja Munde : मेटेंची भेट अधुरी राहिली, 15 ऑगस्टनंतर भेटण्याचे ठरले होते
Ashish Shelar : आशिष शेलार म्हणतात, आमचं ठरलंय, आधी लगीन कोंढाण्याचं…