Toll waiver | गणेश भक्तांना 27ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी – tv9

| Updated on: Aug 27, 2022 | 9:33 AM

मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते

बाप्पांच्या आगमणासाठी सर्वच जन उत्सुक आहेत. चाकरमाने आता कोकणाकडे निघत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे यावेळी गणपतीला घरी जाणाऱ्यांच्या खिशावरचा ताण जरा कमी झाला आहे. ही टोलमाफी 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तर मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यावेळी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गणेश भक्तांना टोल सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पासची आवश्यकता आहे.

Published on: Aug 27, 2022 09:33 AM
Eknath Shinde At Pune | पुण्यात स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला – tv9
लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत Narendra Modi पुन्हा पहिल्या स्थानी – tv9