‘मीच ग्रँडमास्टर, विरोध चितपट!’, विरोधकांवर शिंदे बरसले, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

| Updated on: Aug 16, 2023 | 2:09 PM

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचे स्वागत केलं. त्याचबरोबरल त्यांनी विरोधकांना निशाना करताना गेल्या एक वर्षात आपण त्यांना कसे चितपट केलं आहे ते म्हटलं आहे. सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

ठाणे : 16 ऑगस्ट 2023 | ठाणे येथे जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी गेल्या एका वर्षभरात विरोधक आणि त्यांच्यात झालेल्या राजकीय बुद्धिबळाच्या चालिंवर आणि राजकारणावर भाष्य केलं आहे. यावेळी शिंदे यांनी, विश्वनाथन आनंद यांनी एकाच वेळेला २२ जनांचा सामना केला. खरंतर त्यांनी राजकारणातच यायला हवं होतं. मला तर एकाच वेळी किती तरी विरोधकांशी मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट, काही अडीच घरं चालणारे घोडे. तर काही हत्ती. हे सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. तर गेल्या एक वर्षापासून विरोधक मलाही चेकमेट देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना तस जमलं नाही. विरोधकांचे हे स्वप्न काही पुर्ण होत नाही आहे. उलट मीच जनतेच्या पाठिंब्यानं त्यांनी चितपट करत आहे असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे.

Published on: Aug 16, 2023 02:09 PM
‘…म्हणूनच बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढलाय; राऊत यांच्यावर कुणाचा हल्लाबोल
अजितदादा आणि शरद पवार यांच्या नात्यांत दुरावा? सुप्रिया सुळे म्हणातात…