‘अयोध्या आमचा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अयोध्येला येण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यात आलं आहे. त्याप्रमाणे आपण तेथे जाऊ. तसेच अयोध्या हा आपल्यासाठी श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय असल्याचेही शिंदे यांनी सांगितलं आहे.
मुंबई : देशासह राज्यातील जनतेच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय असल्याने तसेच आम्हाला अयोध्येतूनच बोलवणं आल्याने आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पत्रकारांनी अयोध्येला जाणार का या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अशाप्रकारे आपली भुमिका स्पष्ट केली.
भगवान श्री राम यांच्या जन्मस्थानी म्हणजेच शरयूला येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणे आपण अयोध्येला जाऊ असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं. तसेच हा विषय आपल्यासह जनतेच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा असल्याचेही त्यांनी सांगितलं.
तसेच जेव्हा जेव्हा आपण अयोध्येला जातो तेव्हा एक वेगळा अनुभव मिळतो. तेथे एक उर्जा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Published on: Jan 03, 2023 01:42 PM