मीही दीड वर्षांपूर्वी टाका न घालता, सुई न टोचता ऑपरेशन केलंय, काय म्हणाले मुख्यमंत्री मिलिंद देवरा याचं स्वागत करताना

| Updated on: Jan 14, 2024 | 5:49 PM

कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना एकनाथ गटात प्रवेश केला आहे. यावेळी मिलिंद देवरा भावूक झाले. हा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना धीर देत म्हणाले की आपल्या दोघांत साम्य आहे. दीड वर्षांपूर्वी मी देखील बिन टाक्याचं ऑपरेशन केले आणि सुई देखील लागू दिली नाही असे सांगत आपणही बंड केल्याचं सांगत काही डॅशिंग निर्णय घ्यावेच लागतात असे स्पष्ट केलं.

मुंबई | 14 जानेवारी 24 : कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांनी त्यांच्या समर्थकांसह कॉंग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा आणि माझ्यात साम्य आहे. यावेळी मिलिंद देवरा यांच्याकडे वळून ते म्हणाले की कॉंग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबियांची गेली 55 वर्षे नाळ जुळली होती. आपले वडील मुरली देवरा यांनी महाराष्ट्र आणि देशासाठी कार्य केले आहे. आणि आपण कॉंग्रेसमध्ये आपण खासदार होता आणि मंत्री होता. आपल्या मनात ज्या काही भावना आहेत त्या खऱ्या आहेत. परंतू काही निर्णय घेताना निर्णय घेताना धाडस करावे लागते. काही डॅशिंग निर्णय घ्यावे लागते. बघायला गेला तर आपल्या दोघांमध्ये साम्य आहे. एखादा नगरसेवक असो की ग्रामपंचायत सदस्य देखील निर्णय घेताना दहा वेळा विचार करतात. मी तर नगरविकास मंत्री होतो, माझ्यासोबत 8 मंत्री होते. परंतू दीड वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला बिना टाक्याचे ऑपरेशन केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Published on: Jan 14, 2024 05:48 PM
मी कॉंग्रेस सोडेन असे कधी वाटले नव्हते, माझ्यासाठी भावूक क्षण, मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रीया
राऊतांचं मोती बिंदूचं ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल, पाहा कुणी केली टीका