राज्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; मुंबईत शिंदे, नागपूरात फडणवीस यांनी फडकवला झेंडा
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन केल्यानंतर देशाला संबोधले. यानंतर महाराष्ट्रातही मुंबई, नागपूर, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ध्वजारोहन पार पडला.
मुंबई / नागपूर, 15 ऑगस्ट 2023 | संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात रंगला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन केल्यानंतर देशाला संबोधले. यानंतर महाराष्ट्रातही मुंबई, नागपूर, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ध्वजारोहन पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आधी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यानंतर मंत्रालयात ध्वजारोहण केलं. त्यापाठोपाठ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही ध्वजारोहण केले. तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील विविध ठिकाणी ध्वजारोहण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर येथे ध्वजारोहण केला.
Published on: Aug 15, 2023 11:29 AM