टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | सह परिवार मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दरबारी; मिटकरी यांच्या एका ट्विटने राज्याच भूकंप

| Updated on: Jul 23, 2023 | 9:36 AM

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, नातू, वडील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय होते. पंतप्रधान मोदींनी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आणि माझे कुटुंबीय पंतप्रधान मोदींना भेटलो.

मुंबई, 23 जुलै 2023 | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी, मुलगा, सून, नातू, वडील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय होते. पंतप्रधान मोदींनी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आणि माझे कुटुंबीय पंतप्रधान मोदींना भेटलो. त्यांनी आम्हाला खूप वेळ दिला. तर राज्यातील पावसाची परिस्थिती, रायगडची घटना, राज्यात सुरू असलेले प्रकल्प आणि मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प यावर चर्चा केल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व असं ट्विट केलं होतं. त्यावरून आता टीका आणि टोमने, टोलेबाजी होत आहे. तर विशेष म्हणजे शिंदे यांची 3 दिवसातली मोदींसोबतची ही दुसरी भेट असून ते याच्याआधी 18 जुलैला NDAच्या बैठकीसाठी दिल्लीत हजर होते. फक्त 3 दिवसात दुसरी भेट आणि या महिन्यात 5 व्यांदा दिल्ली दौरा झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. त्यावर हा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 23, 2023 09:36 AM
मुश्रीफ-सतेज पाटील यांच्या दोस्तीचा बंध तुटला? मुश्रीफ यांच्या प्रस्तावावर सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं…
“पंकजांना जास्त त्रास होईल तेव्हा…”, महादेव जानकार यांचा नेमका इशारा कोणाला?