मॉर्फच्या नावाखाली खऱ्या गोष्टी देखील लपवल्या जातायत; अयोध्या पोळ यांचा शिंदे गटाच्या नेत्याला टोला
मॉर्फच्या नावाखाली खऱ्या गोष्टी देखील लपवल्या जातायत; अयोध्या पोळ यांचा शिंदे गटाच्या नेत्याला टोला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संतोष बांगर मध्यंतरी शिविगाळ प्रकरणी चर्चेत होते. हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओही त्यांचा व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बांगर यांचा एक नवीन ऑडिओ व्हायरल झाला. ज्यात संतोष बांगर हे एका जणांशी अश्लील शब्दात बोलत आहेत. त्यांना शिविगाळ करत आहेत. तो व्यक्तीही काही कमी नाही. त्यानेही संतोष बांगर यांना चांगलीच शिविगाळ केली. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी त्यांच्या ट्वीटवरून व्हायरल केला होता.
पोळ यांनी, संतोष बांगर ऑडिओ क्लिप बाबत बोलताना, मी ट्विट केलेला आहे. कुठली गोष्ट खरी असल्याशिवाय मी तसं ट्वीट टाकत नाही असं म्हटलं आहे. मुका घ्या मुका पासून सर्वच आता मॉर्फ केल्यासारखं बोलत आहेत. मॉर्फच्या नावाखाली खऱ्या गोष्टी देखील लपवल्या जात आहेत. जर मी त्यांची बदनामी करत असेन तर त्यांनी माझ्यावरती मानहानीचा दावा करावा आणि फॉरेनसिक टेस्ट करावी असे आवाहन देखील पोळ यांनी केलं आहे.