Eknath Shinde At Pune | पुण्यात स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला – tv9
एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांचे प्रश्न समजावून घेत पुण्यात उद्याच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, संबंधित यंत्रणांना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी देल आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याकडे जात असताना पुणेकरांनी त्यांचा ताफा अडवला तसेच फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड त्रासाचे गाऱ्हाणे ही सांगितले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिकांचे प्रश्न समजावून घेत पुण्यात उद्याच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, संबंधित यंत्रणांना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल आहेत. पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. यामुळे चांदणी चौकात सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिक येथे चांगलेच त्रस्त झाले होते. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा येथून जाणार असल्याचे कळताच नागरिकांनी त्यांचा ताफा अडवला आणि या समस्या त्यांना सांगितल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांचे प्रश्न समजावून घेत पुण्यात उद्याच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, संबंधित यंत्रणांना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे प्रश्न सोडवण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी देल आहेत.