State Cabinet Expansion : शिवसेना नेते गोगावले यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या, तर आला पोटात गोळा; काय आहे नेमकं कारण?
भारत गोगावले यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये फासा फेकला. यात त्यांनी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शिवबंधन हाती बांधलं.
महाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महाडमधील नेते आमदार भारत गोगावले यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये फासा फेकला. यात त्यांनी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी शिवबंधन हाती बांधलं. मात्र यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येच जुंपली. याचदरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायालयानं कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. सध्या राज्यातील सरकार वाचलं आहे. तर गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती न्यायालयानं बेकादेशीर ठरवली आहे. हा गोगावलेंसह शिंदे यांना धक्का मानला जात असतानाच आता गोगावले यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे काहींच्या भुवया उंचवल्या आहेत. तर काही जणांच्या पोटात गोळा आला आहे. कारण, गोगावले यांनी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची कबूली दिली आहे. इतकेच काय तर या मंत्रीमंडळा विस्तारात आपल नंबर असेल असेही त्यांनी सुतोवाच केलं आहे. तसेच एका कार्यक्रमात बोलताना, गोगावले यांनी आता मंत्रिपद घेऊन येतोच असे विधान केल्याने सध्या महाडमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण दिसत आहे.