CM Eknath Shinde| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ठाण्यातील गणेश मंडळांना भेट; जुन्या आठवणीत रमले
मी कधीही विसरू शकत नाही. या किसननगर भागातील लोकांनी मला मोठं केलं. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिली आहे. या ठिकाणी दर्शन घेतले, समाधानी आहे.
ठाणे : गणेशोत्सवानिमित्त मंडळांना भेट देत आहोत. आनंद वाटतोय याच किसननगर भागातून मी नगरसेवक झालो. आमदार झालो, त्यानंतर सर्व पदं मिळत गेली आणि आता मी या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला प्राप्त झाली. ज्या गणेश मंडळाची स्थापना केली होती, त्या मंडळांना मी भेटी देत आहे. या ठिकाणी मला सर्व जुने कार्यकर्ते भेटले. या भागातील नागरिक भेटले. सुरुवात कोणी विसरता कामा नये. माझी सुरुवात या किसननगर भागातून झाली. मी कधीही विसरू शकत नाही. या किसननगर भागातील लोकांनी मला मोठं केलं. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिली आहे. या ठिकाणी दर्शन घेतले, समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी दिली आहे.
Published on: Aug 31, 2022 08:14 PM