मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधानांची भेट घेणार; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा

| Updated on: Sep 22, 2022 | 9:30 AM

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दीड वाजता ही भेट होणार आहे.

नवी दिल्ली :  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दीड वाजता ही भेट होणार आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व असणार आहे. या भेटीमध्ये वेदांता प्रकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या भेटीबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेले अडीच वर्ष केंद्राशी योग्य समन्वय नसल्याने अनेक विकास कामांना ब्रेक लागला. मात्र राज्यातील जे विकास कामे केंद्रीय स्थरावर प्रलंबित आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा होणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याच्या विकासासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी देखील मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 22, 2022 09:25 AM
‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे आक्रमक
दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला बसणार आणखी एक धक्का; शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर?