Eknath Shinde : नंदुरबारला काही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
काहीतरी बदल घडला पाहिजे, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. नंदुरबारला काही कमी पडू देणार नाही, याची खात्री आपल्याला देतो.
मुंबई : काहीतरी बदल घडला पाहिजे, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. नंदुरबारला काही कमी पडू देणार नाही, याची खात्री आपल्याला देतो. चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांच्या पाठिशी अशाच ताकदीने, मजबुतीने तुम्ही उभे राहा. मीसुद्धा त्यांच्यासोबत ताकदीने आहे, असं आश्वासन मुखमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं. यावेळी नंदूरबारची नगरपालिकेची इमारत तयार होते आहे. 30 सप्टेंबरला नगरपालिकेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावं, अशी विनंती रघुनंशी यांनी केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सहमती दर्शविली. नंदुरबार, धुळ्याचे शिवसेनेच्या बहुतेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवलाय. त्यांच्या गटात ते सहभागी झालेत.
Published on: Jul 24, 2022 07:53 PM