सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Sep 27, 2022 | 6:16 PM

सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. तर, निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकालाचे स्वागत आहे. आमच्याकडे बहुमत आहे. विधानसभेत आणि लोकसभेतही आमच्याकडे बहुमत आहे. सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर विश्वास आहे.

Published on: Sep 27, 2022 06:16 PM
देवाच्या कृपेनं जे व्हायचं ते होतं; सत्ता संघर्षावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
…तेव्हाही हे टेबलावर उभं राहून नाचले होते; सत्तासंघर्षाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया