योग दिनाच्या औचित्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन; म्हणाले, ‘ही लोकचळवळ झाली पाहिजे’

| Updated on: Jun 21, 2023 | 12:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या दिनाला आणि उपक्रमाला आता 9 वर्ष होत आहेत. आज राज्यासह देसात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येत आहे. मुंबईतही याचा उत्साहात करण्यात आला.

मुंबई : जागतिक योग दिनाच्या औचित्याने आज भारतासह अख्खे जग योगा करत आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी हा दिन साजरा केला जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या दिनाला आणि उपक्रमाला आता 9 वर्ष होत आहेत. आज राज्यासह देसात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येत आहे. मुंबईतही याचा उत्साहात करण्यात आला. विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज आहे. याच्या आधी देखी भारत हा जगाला काहीना काही देत असतो आताही प्रधानमंत्री मोदी यांनी जगा स्वस्थ आरोग्याची गुरुकिल्ली दिल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले. तर राज्यातील नागरिकांना योग करा, स्वस्थ रहा, निरोगी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Jun 21, 2023 12:12 PM
“बुडाला आग लागल्यावर ठाकरे मोर्चा काढत आहेत”, भाजप नेत्याची जहरी टीका
‘योगा डे’निमित्त पंकजा मुंडे यांनी केला अनाथ मुलांसोबत योगा!