आगामी लोकसभेला राज्यात युतीला किती मिळणार जागा? मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘जनता कामाची पावती देईल’
गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकच्या बंगळुरूत विरोधकांची बैठक सुरू होती. तर काल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही नवी दिल्लीत मित्र पक्षांची बैठक घेतली.
नवी दिल्ली, 19 जुलै 2023 | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमिवर सध्या विरोधकांसह भाजप प्रणीत एनडीएच्या बैठकींना आता वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकच्या बंगळुरूत विरोधकांची बैठक सुरू होती. तर काल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही नवी दिल्लीत मित्र पक्षांची बैठक घेतली. यावेळी राज्यातून अजित पवार गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जन स्वराज पक्षाचे विनय कोरे आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू सामिल झाले होते. यावेळी, देशात लोकसभेला एनडीएच्या 330 जागा निवडून येऊ शकतात. इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या चांगल्या जागा निवडणूक येतील म्हणताना, ४५ प्लस म्हणजेच ४८ जागा निवडणूक येतील असं म्हटलं आहे. तर यामुळे राज्यात विरोधकांना क्लीन स्वीप होईल तर राज्यातील जनता केलेल्या कामाची पावती ही युतीला देईल असे ही मत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.