‘आता फिरतायतं’; उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौर्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका
त्यांनी यवतमाळमधील दिग्रस येथे सभा घेतली. यासभेत त्यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला होता. तसेच त्यांच्यावर टीका केली होती.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी यवतमाळमधील दिग्रस येथे सभा घेतली. यासभेत त्यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला होता. तसेच त्यांच्यावर टीका केली होती. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून खरमरीत टीका केली आहे. यावेळी त्यांनी आधीचं सरकार हे घरात बसून असायचं. पण मी सगळ्यांना बाहेर काढलं. आता फिरताय महाराष्ट्रभर. त्यामुळे कोणाच्या गळ्याच्या तर कोणाच्या कमरेचा पट्टा निघाल्याचा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
Published on: Jul 10, 2023 09:41 AM