Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे – राज ठाकरेंमध्ये 50 मिनिटं भेट, शिंदेंनी घेतले ठाकरेंच्या घरी बाप्पाचे दर्शन
राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन शिंदे यांनी घेतलं. ही सदिच्छा भेट होती, असं या भेटीनंतर शिंदे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची आज भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पन्नास मिनिटं चर्चा झाली. राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन शिंदे यांनी घेतलं. ही सदिच्छा भेट होती, असं या भेटीनंतर शिंदे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी पोहचले. राज ठाकरे यांच्या तीन दिवसांत मोठ्या तीन भेटी झाल्या आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. आणि आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या भेटला त्यांच्या घरी गेले. या सर्व भेटीनंतर मनसे आणि भाजप एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू आहे.