मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा, त्यांना फक्त बिघडवायचे आहे. द्यायचे काहीच नाही
कुणीही अफवा पसरवेल, दिशाभूल करेल. त्यांना फक्त बिघडवायचे आहे. त्यांना द्यायचे काहीच नाही. पण, आपण देणारे आहोत.
ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत. जे काही करेन ते राज्याच्या भल्यासाठी करायचे आहे. काही निर्णय घेण्याचे धाडस आपल्या सरकारने केले. केंद्राचाही पाठिंबा आहे. मोदी यांनीही आपल्या राज्यातील प्रलंबित प्रश्न, रस्ते याचे प्रश्न सोडविले. राज्य आणि केंद्र बाळासाहेब यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवटेकडी इथे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. कुणीही अफवा पसरवेल, दिशाभूल करेल. त्यांना फक्त बिघडवायचे आहे. त्यांना द्यायचे काहीच नाही. पण, आपण देणारे आहोत. काही बाही सांगायचे त्यांचे काम आहे. आपण आपले काम करू. यासाठी तुमची या साथ हवी, असे आवाहन करतानाच त्यांनी नगरसेवक असताना त्या भागात घडलेला एक किस्सा सांगितला.