अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनास शिंदे यांची दांडी?; चर्चांना उधाण
या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन हईल. या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. मात्र आता उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या आधीच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्येच आता नाराजीनाट्य रंगले आहे.
पुणे, 12 ऑगस्ट 2023 | शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक पुलाचे आज उद्घाटन होणार आहे. या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन हईल. या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. मात्र आता उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या आधीच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्येच आता नाराजीनाट्य रंगले आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री शिंदे जाणार नाहीत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी असून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते कार्यक्रमात जाणार नाहीत असे बोलले जात आहे. तर गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असतानाही शिंदे कार्यक्रमाला जाणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.