आधी सडेतोड पण आता राजू शेट्टी यांच्या नरमाईचं कारण काय? फोनवर काय झाली चर्चा?

| Updated on: Jun 13, 2023 | 1:05 PM

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री असणार उपस्थित राहणार आहेत. मात्र याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जाब विचारणार असल्याचे म्हटलं होतं.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी कोल्हापूरमध्ये येत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री असणार उपस्थित राहणार आहेत. मात्र याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जाब विचारणार असल्याचे म्हटलं होतं. पण आता मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरात येण्याआधीच विषय मिटल्याचे कळत आहे. राजू शेट्टी यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं कळत आहे. तर कोल्हापुरात येण्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांची राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं कळत आहे. तर त्यांच्यात आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 15 जूनला दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. तसे मुख्यमंत्री शिंदे यांनीच शेट्टींना आश्वासन दिलं आहे. हे आश्वासन शिंदे यांनी रात्री फोनवरून चर्चा करताना दिलं आहे. त्यामुळं राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र दोन दिवसात बैठक न झाल्यास पुढच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात स्वाभिमानीचे कार्यकर्ते जाब विचारणारच स्पष्ट केली भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

Published on: Jun 13, 2023 01:05 PM
‘…पण 54 % जनता ही विरोधातच, तुमचाच सर्वे सांगतो’; ठाकरे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका
“शिंदेंची शिवसेना स्वत:ला प्रमोट करतेय”, जाहिरातीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया