tv9 Special Report | ‘मस्टर नाही मास्टरमंत्री’, शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर पलटवार
त्यांना आयारामांची पूजा करावी लागते, याचे मला वाईट वाटते. फडणवीस मस्टरमंत्री झाले आहेत का? म्हणजेच ते आता फक्त इतर पक्षांतून आलेल्या लोकांची नावे लिहतील. ते आजून असा किती भार उचलणार?
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनी फडणवीस यांना टोला लगावताना, भाजप हा आयारामांचा पक्ष झाला आहे. त्यांना आयारामांची पूजा करावी लागते, याचे मला वाईट वाटते. फडणवीस मस्टरमंत्री झाले आहेत का? म्हणजेच ते आता फक्त इतर पक्षांतून आलेल्या लोकांची नावे लिहतील. ते आजून असा किती भार उचलणार? ही टीका त्यांनी रविवारी मुंबईत शिवसेना (उद्धव गट) आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जोरदार टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवताना फडणवीस यांचे कौतुक केलं. तसेच ते मास्टर ब्लास्टर आहेत. तर फडणवीस यांना षटकार कसे मारायचे आणि विकेट्स कशा घ्यायच्या माहित आहेत. ते मस्टरमंत्री नाहीत तर मास्टरमंत्री आहेत. पाहा आणखी काय टोलेबाजी केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी…