Chandrakant khaire : औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना – चंद्रकांत खैरे

| Updated on: Jun 07, 2022 | 3:44 PM

मी लहान असल्यापासून ऐकतोय की चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराच नाव संभाजी नगर करणार आहेत. मात्र ते कधीच बदलू शकणार नाही.

औरंगाबाद –  उद्या औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. त्यावरून एमआयएम आव शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाच नाट्य रंगला आहे. एमआयएमचे खासदार इमतीयाज जलील यांनी शिवसेनेचे(Shivsena) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप केला आहे,की मी लहान असल्यापासून ऐकतोय की चंद्रकांत खैरे(Chandrakant khaire) हे औरंगाबाद शहराच नाव संभाजी नगर करणार आहेत. मात्र ते कधीच बदलू शकणार नाही. मी 36  वर्षे असताना माननीय साहेबानी औरंगाबाद हे काढून टाकून ते संभाजी नगर ठेवायचं म्हटलं. त्यामुळे त्यावेळी मी लहान नव्हतो तर ते लहान होते असा टोला जलील यांना लगावला आहे. त्यावेळी त्या ठिकाणी ते राजकारणात नव्हेत. पत्रकार होते. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही अडवू शकत नाही .

 

Published on: Jun 07, 2022 03:44 PM
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अनियंत्रित झाल्याचा व्हिडिओ आला समोर
Sachin wajhe : सचिन वाझेचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल