मुख्य लढत कुणाबरोबर ? अश्विनी जगताप यांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Feb 11, 2023 | 8:03 AM

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपमधून निवडणूक लढवीत आहेत. तर, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या भाजपमधून निवडणूक लढवीत आहेत. तर, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांनी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे म्हटले आहे. तर, अश्विनी जगताप यांनी आपली मुख्य लढत कुणासोबतच नाही असे सांगितले आहे. आमचा जो अजेंडा आहे त्यानुसार आम्ही काम करता आहोत. आमदार लक्ष्मण जगताप यांनी कामाचा जो महामेरू उभा केला आहे त्यावरच ही निवडणूक लढत आहोत. जशी पहिल्यादां आम्ही कामाची सुरवात केली तेच आम्ही पुढे सुरु ठेवत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

Published on: Feb 11, 2023 08:03 AM
अमोल कोल्हे भाजपत प्रवेश करणार? अमोल कोल्हे यांनी स्पष्टच सांगितलं…
‘या’ मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्मदहन; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक