मी उगचचं त्यांना मोठ्या नेत्या म्हणत नाही, उर्फी जावेद प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांना चित्रा वाघ यांचा टोला
उर्फीच्या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा टोला करत सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्याचबरोबर मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंनी हा विषय घेतला असता तर मला ही भूमिका घ्यायची वेळ आली नसती
मुंबई : उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद चिघळताना दिसत आहे. उर्फी हिच्या ट्वीटनंतर वाघ या भडकल्या आहेत. तर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी “उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला सुरू असल्याचा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समाचार घेतला.
तर चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खासगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही तो खपवून घेतला जाणार नाही. असेही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांचा वाघ यांनी आमच्या मोठ्या नेत्या असा उल्लेख केला. तसेच उर्फीच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा टोला करत सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्याचबरोबर मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंनी हा विषय घेतला असता तर मला ही भूमिका घ्यायची वेळ आली नसती. इतक्या दिवसात विषय संपला असता असेही वाघ यांनी म्हंटले आहे.