समाजात वातावरण गढूळ करण्याचे काम अजित दादा का करत आहेत – चित्रा वाघ
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वादग्रस्त करणं योग्य नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधानसभेत वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्याच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. असेच अंदोलन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात देखिल करण्यात आलं.
यावेळी चित्रा वाघ यांनी, अजित पवार यांनी कोणतही कारण नसताना असं वादग्रस्त विधान कसं केलं आणि का असा सवाल केला आहे. त्याचबरोबर असं वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये वातावरण तापवण्याचे आणि ते गढूळ करण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचंही वाघ यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर मागे ही राहुल गांधी यांनी त्यांच्या सभेत सावरकर यांचा अपमान केला. आणि आता अजित पवार यांनी. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्माच्या संरक्षणासाठी बरचं काही भोगलं. तरीही संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. असं अजित पवार यांच्यासारख्या प्रगल्भ नेत्यानं म्हणणं योग्य नसल्याचेही वाघ म्हणाल्या.