संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी, काय आहे प्रकरण

| Updated on: Dec 29, 2024 | 3:46 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभर खळबळ उडाली. या हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यात काल शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात अनेक नेत्यांची भाषणे झाली. या प्रकरणात आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती. या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा महिना होत आला तरीही काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी सरु असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात संध्या सोनवणे यांची का चौकशी सुरु आहे याची माहिती कळालेली नाही.

Published on: Dec 29, 2024 03:45 PM
Beed Murder:’मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे…,’ काय म्हणाले विजय वडेट्टीवार
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस