यवतमाळमध्ये पूरग्रस्त नागरिकांनी अडवला मंत्र्यांचा ताफा; केली ‘ही’ मागणी
यवतमाळमध्ये काल पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले होते. या अडकेलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहेत.
यवतमाळ, 23 जुलै 2023 | यवतमाळमध्ये काल पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले होते. या अडकेलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहेत. आज या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील दाखल झाले. मात्र इथल्या नागरिकांनी त्यांचा ताफा अडवला. मदत करा लवकर अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात आली.
Published on: Jul 23, 2023 12:53 PM