इर्शाळवाडी ग्रामस्थांचे लवकरच स्थलांतर होणार; ‘या’ गावात बांधून देणार पक्की घरं
इर्शाळवाडीवर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
रायगड, 27 जुलै 2023 | इर्शाळवाडी वर डोंगर कोसळल्याने तिथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा खूप गंभीर बनला असून या घटनेनंतर सात दिवसातच राज्य सरकारने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नानीवली गावात सात एकर जमीनीवर या दुर्घटनाग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यांना पक्की घर व घरात लागणाऱ्या आवश्यक वस्तूचे वाटप करतण्यात येणार आहे.यासाठी आज राज्याचे पुनर्वसन आणि आपत्ती मंत्री अनिल पाटील हे इर्शाळवाडीतील नागरिकांना भेट देणार आहेत.
Published on: Jul 27, 2023 12:39 PM