राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Jul 08, 2024 | 2:06 PM

कोकणात कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने रत्नागिरीतील अर्जूना आणि वशिष्टी नदीला पूर आल्याने खेड बाजारपेठेत पुरुषभर उंचीचे पाणी साठले होते. त्यामुळे येथील अडकून पडलेल्या 56 नागरिकांची राजापूर पोलिसांनी रबरी डिंगी बोटीच्या सहाय्याने सुखरुप सुटका केली आहे.

कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधारांनी राजापूरातील नद्यांना पुर आला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा नदीला देखील पूर आला आहे. राज्यातील सर्व नद्यांना पुर आला आहे. काल रात्री राजापूरातील नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी, रत्नागिरी जगबुडी, वशिष्टी, सावित्री अशा नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आता रत्नागिरीतील राजापूर पोलीसांना पुराच्या पाण्यात रेस्क्यू ऑपरेशन राबवित 56 नागरिकांची सुटका केली आहे. काल दिवसभर अर्जूना नदीला पूर आला होता. राजापूरातील खेड बाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी साचले होते. नगर पालिकेला मिळालेल्या रबरी बोटी आणि रत्नागिरी नौका विभागाचे कर्मचाऱ्याचे मदतीने राजापूर पोलिसांनी 56 नागरिकांचे प्राण वाचविले आहेत.

 

Published on: Jul 08, 2024 02:05 PM
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय काय…