पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदी
जय शिंदे यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला आहे. तसंच मनसे मंदिरांसाठी लढा उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे काशीतील ज्ञानवापीचं लोण आता पुण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्याविरोधात मनसेकडून लढा उभारण्यात येईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातही मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्या आहेत. पुण्यातील कसबा पेठ परिसरात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या आहेत. काशीतील ज्ञानवापी मशिदीप्रमाणे या मंदिरांच्या जागेवर छोटा शेख आणि बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले. त्याबाबत अजय शिंदे यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला आहे. तसंच मनसे मंदिरांसाठी लढा उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे काशीतील ज्ञानवापीचं लोण आता पुण्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे.