Special Report | शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये संघर्ष वाढला
फक्त आदित्य ठाकरेच नाहीत. तर थेट उद्धव ठाकरेही शिंदे गटाच्या टार्गेटवर आहेत. शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयातले उद्धव ठाकरेंचे फोटोही हटवले आहेत. उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या जागी आता एकनाथ शिंदेंचे फोटो झळकू लागले आहेत.
मुंबई : शिंदे गटातले आमदार आणि भूम परांड्याचे लोकप्रतिनिधी असलेले तानाजी सावंत यांनी थेट आदित्य ठाकरेंवर(Aaditya Thackeray) निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) पुणे दौऱ्यावर आहेत. आणि आदित्य ठाकरेही पुण्यात शक्तिप्रदर्शन करतायत. याच विषयावर बोलताना तानाजी सावंत यांचा पारा चढला. त्यांनी आदित्य ठाकरेंचा एक साधा आमदार असा उल्लेख केला. थेट आदित्य ठाकरेंवर टीका झाल्य़ानं शिवसेनेनंही तानाजी सावंतांना धारेवर धरलं. कोण तानाजी सावंत असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केला. तानाजी सावंत यांच्या वक्तव्य़ावर स्वत: आदित्य ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिलीय. तानाजी सावंत यांच्याकडे आपण लक्ष देत नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. फक्त आदित्य ठाकरेच नाहीत. तर थेट उद्धव ठाकरेही शिंदे गटाच्या टार्गेटवर आहेत. शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयातले उद्धव ठाकरेंचे फोटोही हटवले आहेत. उद्धव ठाकरेंच्या फोटोच्या जागी आता एकनाथ शिंदेंचे फोटो झळकू लागले आहेत. शिंदे गटातले आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांनी ठाकरेंभोवतीच्या लोकांवर आक्षेप नोंदवला होता..पण थेट ठाकरेंवर टीका करणं टाळलं होतं. किरीट सोमय्यांनी ठाकरेंवर टीका केल्यानंतरही शिंदे गटानं आक्षेप घेतला होता. पण आता शिंदे गटातल्या आमदारांनीच ठाकरे परिवाराला टार्गेट करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु केलाय. शिंदे गट आणि ठाकरेंमधला विसंवाद वाढलाय..परतीचे दोर कापले गेले आहेत.