समीर वानखेडेंना क्लीन चिट!

| Updated on: Aug 13, 2022 | 12:02 PM

समीर वानखेडे यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले.

मुंबई: एनसीबी (NCB) मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समिती (Caste scrutiny committee) कडून क्लीन चिट मिळालीये. क्लीन चिट देताना समितीने अहवालात म्हटलंय, ‘वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते; वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असंही सिद्ध झाले नाही, परंतु हे सिद्ध झाले आहे की ते महार -37 अनुसूचित जातीचे होते. ‘समीर वानखेडे यांची जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी (MahaVikasAghadi)सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले. नवाब मलिक यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. पण आता वानखेडेंना क्लिनचिट मिळाली आहे.

 

 

 

Published on: Aug 13, 2022 12:02 PM
दबावतंत्र हे माझ्या स्वभावात नाही- संजय शिरसाट
पंकजा मुंडेंचं ढोल वादन, परळीत तिरंगा रॅली!