राज्यात पुन्हा मास्कसक्ती?
पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच थोपवा, कोरोना निर्बंध नको असतील तर तुम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Published on: Apr 28, 2022 09:57 AM