Cm Devendra Fadnavis : बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? ते स्वातंत्र्य सेनानी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट सवाल

| Updated on: Mar 25, 2025 | 2:42 PM

CM Devendra Fadnavis On Criminals : अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणावरून आज जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वादंग झाल्याचं विधान परिषदेच्या सभागृहात बघायला मिळालं.

दंगेखोर आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का? ते स्वातंत्र्य सेनानी आहेत का? अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर व्हायला नको होता, नसता झाला तर बरं झालं असतं. मात्र त्याचा एवढा पुळका विरोधकांना का येतो? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. आज विधिमंडळ अधिवेशत ते भाष्य करत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड ज्यावेळी राज्यातील घटना घडामोडींबद्दल बोलत होते. त्यावेळी ते बांगलादेश विषय बोलता की काय? असा प्रश्न मला पडला. राज्यातल्या दंगेखोर आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का येतो आहे? अक्षय शिंदे याचा एनकाऊंटर झाला नसता तर चांगले झाले असते. मात्र तो स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखी छाती बडवली जात असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला आहे. दंगेखोर आणि बलात्कार यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मात्र त्यांच्या विषयी कोणाच्या मनात संवेदना निर्माण झाली असेल तर ते योग्य नाही. त्या संदर्भात त्यांची मने तपासूनच पहावी लागतील, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना शेरोशायरी करत टोला लगावला.

Published on: Mar 25, 2025 02:42 PM
Sanjay Raut : संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, ‘हारामXXX अन्…’
Daund Crime News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लॅस्टिकच्या बरण्या; बरण्यांमध्ये अर्भकं, काय आहे प्रकार?