गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 26, 2025 | 6:38 PM

विधिमंडळ अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी संविधानावर चर्चा झाली. यावेळी भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संविधानाचा अर्थ समजावून सांगितला.

आपल्या देशाचं संविधान हे 10-12 देशांच्या संविधानातील गोष्टींपासून तयार झालं असल्याचा आरोप काहीजण करतात. पण तसे नाही. हे पूर्णतः भारतीय तत्वांवर तयार करण्यात आलेले संविधान आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना म्हंटलं आहे. सभागृहात आज संविधानावर चर्चा झाली. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधान सभेमध्ये भारताच्या ध्वजावर चर्चा सुरू होती, तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, जोवर आपण सद्गुणांवर चालत नाही, तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य व धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हंटलं.

धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला, तो बदलांना प्रतिकार केल्यामुळे आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही, तोवर आपण सत्य व सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की, एका ठिकाणी थांबलो की एकेठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे, ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जिवन आहे,  असंही फडणवीस यांनी बोलताना म्हंटलं.

Published on: Mar 26, 2025 06:38 PM
‘नया है वह…’, जितेंद्र आव्हाड आणि नितेश राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्…
Sambhaji Bhide : ‘…हेच सत्य अन् संभाजीराजे बोलले ते 100 टक्के चूक’, रायगडावरील वाघ्या कुत्र्यासंदर्भात भिडे गुरूजींचं मोठं वक्तव्य