CM Devendra Fadnavis : कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे; मुख्यमंत्र्यांनी कुणाल कामराचा केला निषेध
CM Fadnavis On Kunal Kamara Controversy : कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिंदे गटावर केलेल्या विडंबन गाण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत त्यावर टीका केली आहे.
स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कुणाल कामराला हे माहिती हवं की महाराष्ट्राच्या जनतेने 2024मध्ये कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलं आहे, असं म्हणत कॉमेडीयन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्याचा निषेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली हे जनतेने ठरवलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते आणि जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करणं चुकीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.
Published on: Mar 24, 2025 12:22 PM