CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
CM Devendra Fadnavis Nashik Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसंच सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा देखील घेतला.
त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार केला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज मुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी यावेळी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कुंभमेळ्यासाठी अॅक्शन प्लॅन सांगितला आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, देशभरातील लोक इथे येतील. कॉरिडॉर तयार करणे, पार्किंग, शौचालय तयार करणे, तिथले मंदिरं आणि कुंडाची दुरूस्ती करणे. गे ब्रह्मगिरी परिसरात नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या आहेत. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्ध राहिले पाहिजे, या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी त्याचे काम पूर्ण करायचे, असा प्रयत्न केला जाणार आहे. या कामाला खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय घेतलाय की, याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे कामांसाठी आवश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.