Video : राज्याची सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीतील स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

| Updated on: Mar 22, 2023 | 10:38 AM

Cm Ekanth Shinde Gudhi Padwa Shobhayatra : आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र मराठी नववर्षाचं स्वागत केलं जात आहे. डोंबिवली शहरातही नववर्षाच्या जल्लोषात स्वागत केलं जातंय. या स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत. पाहा व्हीडिओ...

डोंबिवली : आज मराठी नववर्षातील पहिला दिवस. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागतयात्रेत पायी चालत सहभागी झाले होते. डोंबिवली हा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे. राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख आहे. त्यामुळे डोंबिवलीत पारंपरिक पद्धतीने नवी वर्षाचं स्वागत केलं जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात भव्य नववर्ष स्वागतयात्रा निघते. यंदाच्या या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग पाहायला मिळाला.

Published on: Mar 22, 2023 10:13 AM
मुख्यमंत्री खुर्चीवरच मनसेचा दावा; भावी मुख्यमंत्री, बॅनरबाजी
संविधानावर हल्ला होतोय : अरविंद सावंत