मध्यरात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील शिवसेना कार्यालयात; काय कारण? पाहा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी केली. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा...
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी केली. या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच मध्यवर्ती कार्यालयात आले. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “पुण्यातील आमचं कार्यालय बघायला आलो आहे. आमच्या नेत्यांनी इथं मला बोलावलं आणि मी आलो. आमच्या लोकांनी मिळून भव्य कार्यालय त्यांनी पुण्यात उभं केलं आहे. तेच पहायला मी आलो आहे. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे रात्री 2 वाजता देखील एवढी गर्दी दिसत आहे. सगळे लोकं भेटायला आले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी काय ऋणी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
Published on: Feb 23, 2023 08:03 AM