मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा, स्वागतासाठी बॅनर अन् पोस्टर्स

| Updated on: Apr 08, 2023 | 8:21 AM

CM Eknath Shinde Ayoghya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झालीये पाहा व्हीडिओ...

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बॅनरवर मुख्यमंत्री यांचा ‘भगवा धारी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्टेज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याच ठिकाणी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि आमदार, खासदारांसह शरयू नदीची आरती करणार आहेत. या आरतीची तयारी आता सुरुवात झाली आहे. शिंदे यांच्या या दौऱ्यात भाजपचेही काही नेते सहभागी होणार आहेत. मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, मोहित कंबोज हे भाजपचे नेते अयोध्येला जाणार आहेत.

Published on: Apr 08, 2023 08:21 AM
संजय राठोड यांचे नाव घेत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा झोडपलं; पाहा व्हीडिओ…