मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले? ‘त्या’ बँक खात्यासंदर्भात यापूर्वी नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Aug 05, 2023 | 9:11 AM

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 50 खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला 50 कोटी रुपये दिले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. “आमच्या 50 आमदारांना तुम्ही वारंवार हिणवत आहात. खोके आणि गद्दार यांचादेखील सोक्षमोक्ष लावला पाहिजे. खरं म्हणजे या महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हेही बघायला पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान बँकेतील खात्यासंदर्भात यापूर्वी नेमकं काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Aug 05, 2023 07:51 AM
राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? पाहा व्हिडीओच्या माध्यमातून…
सर्व जिल्हा परिषदांमधील ‘या’ पदांसाठी तब्बल १९ हजाराहून अधिक पदांची जम्बो भरती, गिरीश महाजन म्हणाले…