“काहीजण कंत्राटदारांची भाषा बोलायला लागले”, मुख्यमंत्री शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला

| Updated on: Jun 07, 2023 | 7:37 AM

चांदीवली येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर टीका केली आहे.

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे पिता-पुत्र यांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे मुंबईमध्ये बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मुंबईत सभा घेत आहेत. मुंबई महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आणि ठाकरे यांचा पराभव करण्यासाठई शिंदे पिता-पुत्र सज्ज झाले आहेत.  चांदीवली येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर टीका केली आहे. “एवढी कामं होत असल्यामुळे काहींची पोटदु:खी वाढत आहे. काहीजण कंत्राटदारांची भाषा बोलायला लागले आहेत”, असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदे यांनी अदित्य ठाकरे यांना लगावला आहे. “बाळासाहेब ठाकरेच्या नावाने चार दवाखाने तयार केलेले आहेत. पोटदुखी होतेय त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दवाखानात जावं”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

Published on: Jun 07, 2023 07:37 AM
वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पपई जमीनदोस्त; कुठं झाला अवकाळी?
धक्कादायक ! पुण्यात पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार ?