“जे घरी बसून काम करतात, जनता त्यांना घरी बसवेल”, नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल
शनिवारी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नाशिक: शनिवारी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “लोकांच्या दारोदारी सरकार फिरतंय. आम्हांला लोकांच्या दारात जायला लाज वाटत नाही, सत्ता हि लोकांच्या दारोदारी फिरून काम करण्यासाठी असते. काही लोकांनी घरी बसून कामे केली. त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवेल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: Jul 16, 2023 07:46 AM