एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा; म्हणाले, “ईडीच्या चौकशीनंतर ही लोकं मोर्चे काढतात”
ईडीच्या चौकशीवरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. ठाकरे गट येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर महामोर्चा काढणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “चौकशी लागली आणि मग यांना मोर्चाची आठवण झाली. तुम्हीच तर होते ना इतके वर्ष, मग मोर्चा कोणाविरुद्ध काढताय? तुमचेच काम आहे. मागील 15 ते 20 वर्षे तुम्हीच होतात ना, पण मुंबई खड्डेमुक्त करण्याचं काम आम्ही करतोय पुढील अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार.आम्ही त्यासाठी खर्च करतोय तर एफडीची बोंब मारली. मी माहिती घेतली तर आमचं सरकार आल्यानंतर 11 हजार कोटीने एफडी वाढली आहे. कसला हिशोब मागत आहात. बरं आहे दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठाकरेंना लगावला.
Published on: Jun 26, 2023 10:16 AM