गडचिरोलीच्या लेडी ड्रायव्हरची शिक्षणासाठी इंग्लंड भरारी; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 40 लाखांची शिष्यवृत्ती
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा रेगुंठा येथील ‘लेडी ड्रायव्हर’ किरण कुरमावर हिचे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
गडचिरोली, 01 ऑगस्ट 2023 | गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा रेगुंठा येथील ‘लेडी ड्रायव्हर’ किरण कुरमावर हिचे विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने किरणला 40 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड येथील लीड्स विद्यापीठात किरण प्रवेश घेणार आहे.राज्याच्या एका टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा ते सिरोंचापर्यंत ‘टॅक्सी’ चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरण कुरमावार हिला उच्च शिक्षणासाठी समाज कल्याण विभागाने 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंडमधील प्रसिद्ध अशा लीड्स विद्यापीठात ‘इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.
Published on: Aug 01, 2023 09:09 AM