शिंदेगटाचे आमदार रमेश बोरनारे आणि पोलिसांच्यात बाचाबाची, पाहा व्हीडिओ…
शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्याचा व्हीडिओ पाहा...
शिंदेगटाचे आमदार रमेश बोरनारे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक आढावा बैठकीसाठी बोरनारे हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. मात्र याचवेळी पोलिसांनी रमेश बोरनारे यांची गाडी अडवली. इतर सर्वांच्या गाड्या सोडल्या माझीच का गाडी अडवली, असं बोरनारे यांनी पोलिसांना विचारलं. यावेळी पोलीस आणि बोरनारे यांच्यात काही काळ बाचाबाची झाली. पाहा व्हीडिओ…
Published on: Jan 25, 2023 03:20 PM